* आता काँग्रेसचे निवेदन !
* भूमिपूजन ठरतेय मृगजळ
मारेगाव: दीपक डोहणे- मारेगाव बसस्थानक बनण्याचा बहुचर्चित प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. बसस्थानका संदर्भात जनतेची आग्रही मागणी लक्षात घेता मिनी बस स्थानकासाठी हाय वे लगत प्रस्तावित 2 हजार 740 चौरस मीटर जागेवर बसस्थानक व्हावे या मागणी साठी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार वामनराव कासावार यांचे नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दि. 11 ऑगष्टला निवेदन सादर केले.
विशेष म्हणजे मागील वर्षी बसस्थानक साठी विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे हस्ते भूमिपूजन झाले होते. अनेक वर्षांपासून रखडलेला मारेगाव बसस्थानकाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बस स्थानकासाठी खनिज निधीच्या माध्यमातून महसुल विभागाची जागा उपलब्ध करून परिवहन विभागाला सुपुर्त करण्यात आली. परन्तु त्या जागेवर दिड वर्षापासून विद्यमान लोकप्रतिनिधीच्या हस्ते बस स्थानकाचा फलक लावला आहे.
प्रस्तावित त्याच जागेवर सुंदर बसस्थानक व्हावे यासाठी कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी माजी आमदार वामनराव कासावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मारेगावात बसस्थानक व्हावे यासाठी निवेदन सादर केले.
तालुक्यातून खनिज उत्पादनातून मिळणारा करोडो रुपयाचा कर शासनाला प्राप्त होतो, त्या माध्यमातून जर तालुका वासियाच्या सुविधेसाठी खनिज निधीतून बसस्थानक उभारण्यासाठी लोकप्रतिनिधीने प्रयत्न केल्यास बसस्थानक बनण्याचा मार्ग निघेल असा उल्लेख जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
निवेदन सादर करते वेळी मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मारोती गौरकार, काँग्रेस कमेटीचे जिल्हा सचिव तुळसीराम कुमरे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष युसुफ भाई शेख उपस्थित होते.