Home क्राईम धक्कादायक..अखेर खापरी येथील युवकाचा मृत्यू

धक्कादायक..अखेर खापरी येथील युवकाचा मृत्यू

1042

* मारहाण प्रकरण….

* संशायित आरोपींच्या गुन्ह्यात ‘मर्डर’ ची वाढ

मारेगाव: दीपक डोहणे- तालुक्यातील खापरी येथे मागील मंगळवारला तिहेरी कुटुंबात झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात रुपेश कुचनकार यास गंभीररीत्या मारहाण करण्यात आली. त्याचेवर यवतमाळ येथे उपचार सुरू असताना काल गुरुवारला रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली असून संशायित आरोपीच्या गुन्ह्यात खुनाचा गुन्हा दाखल होण्याच्या हालचालीला वेग आला आहे. परिणामी मारेगाव तालुक्यात अंतर्गत कलहाने ‘क्राईम’ वाढत असल्याचे चित्र बळावत आहे.

खापरी येथे मागील मंगळवारला पवन भीमराव उरवते, शंकर हरिश्चंद्र पाचभाई व गौरव हरिश्चंद्र पाचभाई यांच्यात वाद निर्माण होऊन हा वाद विकोपास गेला. वाद काही प्रमाणात शांत झाल्यानंतर येथील युवक रुपेश सुधाकर कुचनकार वादाबाबत चर्चा करू लागला ही चर्चा वाद करणाऱ्यांच्या जिव्हारी लागल्याने त्याचेवर काठीने मारहाण केली. या मारहाणीत 30 वर्षीय रुपेश हा निपचित पडला. त्याला मारेगाव रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले मात्र त्याची प्रकृती दिवसागणिक ढासळत असतांना गुरुवारला रात्री नऊ वाजताचे सुमारास रुपेश याची प्राणज्योत मालवली.

वाद निर्माण झालेल्या घटनेच्या दिवसाला पवन उरवते सह शंकर व गौरव पाचभाई यांचेवर जीवे मारण्याचे गुन्हे दाखल करून यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र रुपेशच्या मृत्यूने संशायित आरोपींच्या गुन्ह्यात वाढ होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मृतक रुपेश हे येथील पोलीस पाटील सुधाकर कुचनकार यांचे पुत्र असून मृतकाच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहे. खापरी येथे मृतदेह आणण्यात आला असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अलीकडेच तालुक्यात अंतर्गत कलहाचे प्रमाण वाढून जीव घेण्याचे प्रकार वाढीस लागते आहे त्यामुळे तालुक्याची तूर्तास अशांत कडे वाटचाल सुरू आहे.