Home वणी परिसर पिवरडोल येथे कृषिदूताने केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पिवरडोल येथे कृषिदूताने केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

214
कीड व्यवस्थापन व गुलाबी बोंडअळी बाबत जागर

मुकुटबन:  झरीजामणी तालुक्यातील ‘पिवरडोल’ येथे कृषिदुत वैभव विठ्ठलराव गुरणूले या विद्यार्थ्याने कामगंध सापळे pheromone ट्रॅप लावून, गुलाबी बोंड अळीचा उद्रेक थांबवता येईल. या बद्दल शंकर वाडगुरे यांच्या शेतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तो पांढरकवडा येथील कृषी महाविद्यालय कोंघारा मधील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी आहे.

शेतातील हातात आलेल्या पिकांचे किड्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतात कामगंध सापळे कसे लावावे. याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून धुमाकूळ घातलेल्या गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी helilure हा गंध वापरावा व शेताच्या बांधावर भेंडी आणि एरंडी तसेच झेंडू ची झाडे चौफेर लावावी. अळी दिसलेले झाड त्वरित नष्ट करावे, बियाण्याची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. तसेच सापळे लावताना व फवारणी करताना, शेतकऱ्यांनी मास्क, चष्मा, हातमोजे, घालूनच सापळे लावावेत व फवारणी करावी. सापळे लावताना, खर्रा, तंबाखू तसेच तत्सम धूम्रपान करू नये. याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी शंकर वाडगुरे, अविनाश शेंडे ,यादव ठाकरे, विष्णू वाढई, संदीप गुरणूले व परिसरातील शेतकरीवर्ग उपस्थित होते.