Home सामाजिक राष्ट्रध्वजाचा अवमान करु नका..

राष्ट्रध्वजाचा अवमान करु नका..

142

* वारली चित्रातून शेखर वांढरे यांचा संदेश

 वणी बातमीदार: आज देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. देशभरात विविध ठिकाणी देशवासियांनी आपापल्या पद्धतीने देशाचा ध्वज अर्थात तिरंगा फडकावला. काही ठिकाणी पालकमंत्र्यांनी, काही ठिकाणी राज्यपालांनी, काही ठिकाणी मंत्र्यांनी तर काही ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने ध्वजारोहण केलं मात्र आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये याकरिता वारली चित्रातून जनजागृतीचा ‘जागर’ करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात तरुणाई न्हाऊन निघताना  दिसते. झेंड्यासह दुचाकीवरून रपेट मारताना तरुणांनी  आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये याकरिता सजग राहणे गरजेचे आहे. वारली चित्रकार तसेच पोलीस विभागात कार्यरत असणारे शेखर वांढरे सातत्याने वारली चित्राच्या माध्यमातून जनजागृती करतात. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी रेखाटलेले चित्र आकर्षित करत असतानाच जनजागृतीचा ‘जागर’ असल्याचे मत व्यक्त होत आहे.