Home सामाजिक स्वातंत्र्य दिनी जाणून घ्या “स्व” चे तंत्र

स्वातंत्र्य दिनी जाणून घ्या “स्व” चे तंत्र

99

*सहजयोग ध्यान ऑनलाईन कार्यक्रम 15 ऑगस्टला यूट्यूब वर लाईव्ह 

वणी बातमीदार: स्वातंत्र्य दिनानिमित्ताने श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत सहजयोग ध्यानकेंद्र प्रतिष्ठान पुणे येथुन ऑनलाईन योगाचा, ध्यानाचा भव्य कार्यक्रम रविवारी दि. 15 ऑगस्ट रोजी सायं 5 वाजता learningsahajayoga यूट्यूब चॅनेलवर  लाईव्ह प्रसारीत  केला जाणार आहे. तरी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहजयोग समन्वयक स्वप्निल धायडे व वणीचे समन्वयक रवी कुंटावार यांनी केले आहे.

भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 74 वर्ष पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्यासोबत ‘स्व’ चे तंत्र जाणून घेणे हे आजच्या युगात प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. असे श्री माताजी निर्मलादेवी यांचे ध्येय होते . त्या अनुसार 5 मे 1970 रोजी मानवातील सूक्ष्म शरीराद्वारे (स्व चे तंत्र ) कुंडलिनी शक्ति जागृत करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी सहजयोग ध्यान पद्धती सुरु केली. सहजयोग ध्यानाद्वारे सर्व समस्यांवर मात करण्याची शक्ति प्राप्त होऊन आंतरिक परिवर्तन सुलभ होते .

15 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत दररोज संध्याकाळी 5 वाजता मराठी आणि हिंदी भाषेतून सहजयोग ध्यान कार्यशाळा विनामूल्य घेतल्या जाणार आहे. भारत योग भूमी आहे आणि प्रत्येक कालखंडात योगाभ्यास केला जायचा. आजच्या स्पर्धेच्या आधुनिक युगात शारिरीक आजार, नैराश्य, ताण, नकारात्मक विचार, अशा अनेक आधुनिक समस्या दैनंदिन जीवनात आहेत. या समस्यांचा सामना करायला आपल्या शरीरातील सुप्त शक्ती च्या जागृतीद्वारे ध्यानाने स्वपरिवर्तनाची सुरवात करून स्वातंत्र्य दिनी ‘स्व’ चे तंत्र याद्वारे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

सदर कार्यक्रमात सहजयोग ध्यानाद्वारे होणारे फायदे – सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. सकारात्मक विचारशैली निर्माण होते.  ताणतणाव कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. रोग प्रतिकार शक्ती वाढते. चित्ताची एकाग्रता वाढते. चिडचिड कमी होते. अभ्यासात प्रगती होते. नैराश्य दूर होते. यावर माहिती दिली जाईल व प्रात्यक्षिक केले जातील  YouTube चॅनेल www.youtube.com/c/learningsahajayoga  यावर हा मोफत कार्यक्रम सर्वांनी रविवारी सायं  5 वा बघावा. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रं 1800 2700 800 वर संपर्क करावा असे आवाहन सहजयोग परिवारातर्फे करण्यात आले आहे.