Home वणी परिसर मंगला शरद कोंडावार यांचे निधन

मंगला शरद कोंडावार यांचे निधन

316

वणी  बातमीदार:  येथील प्रतिष्ठित डॉक्टर शरद कोंडावार यांच्या पत्नी मंगला शरद कोंडावार यांचे दि. 16 ऑगस्ट ला अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्या आर्यवैश्य महिला आघाडीच्या प्रथम अध्यक्षा होत्या तसेच लॉयनेस क्लबच्याही त्या प्रथम अध्यक्षा होत्या. त्यांची सामाजीक कार्यात विशेष रुची होती. शेवटपर्यंत त्यांनी अध्यात्मक कार्य केले.  पाच वर्षांपर्यंत त्यांनी दासबोध वर्ग चालविले होते. त्यांच्या मागे पती डॉ. शरद कोंडावार, दोन मुलं, एक मुलगी, सुना, नातू असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार दि. 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता येथील मोक्षधाम वर करण्यात येणार आहे.