Home Breaking News आंदोलनाची धग कायम…

आंदोलनाची धग कायम…

603
* मुख्याधिकारी, अभियंता रजेवर !
* तहसीलदार- उंबरकर चर्चा निष्फळ

मारेगाव बातमीदार: दीपक डोहणे– स्वातंत्र्य दिनापासून मारेगाव नगरपंचायत समोर सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनाची धग सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. आज मंगळवारी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, तहसीलदार दीपक पुंडे व करनिरीक्षक तुरणकार यांच्या समवेत चर्चा निष्फळ ठरली. विशेष म्हणजे आंदोलन आक्रमक पवित्र्यात असतांना मुख्याधिकारी, अभियंता रजेवर गेल्याने प्रशासनाच्या पळकाढू भूमिकेची रंगीबेरंगी चर्चेला आता उधाण आले आहे.

मारेगाव शहरासह प्रभाग आठ मधील अधिकाराचा दुरूपयोग करीत काँक्रीटीकरण रस्ता कमी बांधकाम करण्यात आले. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून मुख्याधिकारी व अभियंत्यांनी मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा चालविला. अशातच मारेगाव नगर पंचायत चा कार्यकाळ संपुष्टात आल्यागत एकमेव कंत्राटदारशी भागीदारी शहरात निकृष्ठ दर्जाचे कामे करीत सलगी साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

परिणामी मंगळवारी सलग तिसऱ्या दिवसाला घंटानाद आंदोलनाची धग कायम असतांना आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी तहसीलदार दीपक पुंडे व मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह प्रशासकीय प्रतिनिधी तुरणकार आंदोलन स्थळी आले. तहसीलदार पुंडे  यांनी जिल्हास्थळी भ्रमणध्वनी वरून चर्चा करीत डिपीओ गावंडे यांनी वेळकाढूपणा दाखवीत थातुरमातुर उत्तरे दिली. तुरणकार यांनी माझ्या अखत्यारीत हे काम येत नसल्याचे गोडीगुलाबीने चुप्पी साधली. यात राजू उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत उद्या मुख्याधिकारी व अभियंता यांना आंदोलन स्थळी हजर करा अन्यथा मनसे स्टाईल कृतीत उतरविण्याचा गर्भित इशारा दिला.

दरम्यान प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रजा किती दिवस टाकली याबाबत सर्वच अनभिज्ञ असतांना रजेच्या चर्चेला तर्कवितर्क लावल्या जात आहे. शहरातील बोगस कामाचे शिलेदार ‘पळवाटा’ शोधत असल्याचा आज मात्र येथे प्रत्यय आला आणि असंतोषही खदखदत होता. आंदोलनाचा उद्या नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले