Home वणी परिसर ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करा अन्यथा…..

ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करा अन्यथा…..

169

* तीव्र आंदोलन छेडू, डॉ. अशोक जिवतोडे यांचा इशारा

वणी बातमीदार:  महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यात कमी केलेले ओबीसींचे आरक्षण पुर्ववत केल्यास महाविकास आघाडी सरकारचे मोठे यश होईल. अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी राज्य सरकार ला सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.

राज्यातील एकूण 8 जिल्ह्यातील अनुक्रमे चंद्रपुर 11 टक्के, गडचिरोली 6 टक्के, यवतमाळ 14 टक्के,  नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, रायगड 9 टक्के या जिल्ह्यातील 1994,1997  व 2002 च्या परीपत्रकानुसार वर्ग क व ड या पदांकरीता आरक्षण कमी केलेले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पुर्ववत होणे आवश्यक होते. तसेच शासनाने 8 जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण वाढविणे गरजेचे होते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात इतर मागास वर्गाचे आरक्षण  वाढविण्यासाठी तीव्र निदर्शने व आंदोलने करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार करता इतर मागास प्रवर्गाची लोकसंख्या प्रत्येक जिल्ह्यात जास्त असुन क व ड पदाचे आरक्षण कमी आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. 12 जुन 2020 ला 8 जिल्ह्यातील आरक्षणासाठी स्थापन झालेल्या उपसमीतीने लवकरात लवकर निर्णय घेवुन इतर मागास प्रवर्गाचे वर्ग क व ड पाडाचे आरक्षण इतर जिल्ह्याप्रमाणे पूर्ववत  करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येइल, असा निर्वाणीचा ईशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या मार्गदर्शनात दिला आहे. तरी हा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतल्यास महाविकास आघाडी सरकारचे हे फार मोठे यश राहील, असे मत डॉ. अशोक जिवतोडे यांनी व्यक्त केले.

Previous articleवणीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन.
Next articleआंदोलनाची धग कायम…
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.