Home वणी परिसर पिकांना मिळाली संजीवनी, बळीराजा प्रफुल्लित

पिकांना मिळाली संजीवनी, बळीराजा प्रफुल्लित

107
Img 20240930 Wa0028

कुंभा (मारेगाव): बंडू डुकरे- पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाची शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते. खाली माना टाकलेल्या पिकांना जगवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. काल आलेल्या मुसळधार पावसाने पिकाला नव संजीवनी प्राप्त झाली आहे तर पाऊस आल्याने शेतकरी प्रफुल्लित झाला आहे.

खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस आला. शेतकऱ्यांची पिके डोलायला लागली होती. निंदन-खुरपण योग्यरीत्या होत असतानाच मागील 15 दिवसापासून पावसाने उसंत घेतली. जमीन कडक येऊन डवरणी व खुरपणी ची कामे थांबलीत. यामुळे मजुरांच्या हाताला काम सुद्धा मिळेनासे झाले होते. सोयाबीन व कापूस, फुलावर व फळधारणा अवस्थेत असल्याने पावसाची नितांत गरज होती आणि दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली तर बळीराजा प्रफुल्लित झाला आहे.

Previous articleदुचाकीची अपघातात दोन गंभीर जखमी
Next articleबोर्डा गावात विविध समस्येचा ‘विळखा’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.