Home Breaking News प्रशासनाच्या रस्ता मोजणीच्या बाता..अन आंदोलनाची सांगता ..!

प्रशासनाच्या रस्ता मोजणीच्या बाता..अन आंदोलनाची सांगता ..!

638

*अभियंत्यांनी मागितली माफी…!

मारेगाव : दीपक डोहणे- मागील चार दिवसांपासून घंटानाद आंदोलन सुरु असतांना येथील मुख्याधिकारी मोकळ यांनी पळवाट शोधली. अखेर मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी टोकाची भूमिका घेत प्रशासनास आंदोलन स्थळी बोलावीत अतिक्रमित रस्ता मोजणी करूनच पूर्णत्वास नेण्यावर भर देण्यात आला. तशा आशयाचे नगरपंचायत ने तात्काळ पत्र भूमिअभिलेख कार्यालयाला दिले आणि आणि घंटानाद आंदोलनाची सांगता करण्यात आली.

शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता अतिक्रमण न काढता अरुंद बांधण्यात आला. यास सर्वस्वी जबाबदार नगरपंचायत चे मुख्याधिकारी व अभियंता यांना दोषी ठरवीत  अतिक्रमण काढून रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी घंटानाद आंदोलन पुकारले. सदर आंदोलनाकडे येथील प्रशासनाने पाठ फिरविण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागण्याच्या यावेळी शाब्दिक लाखोळ्या वाहण्यात आल्या. प्रसंगावधान साधून याप्रसंगी अभियंता यांनी सर्वांसमक्ष माफी मागितली. नगरपंचायतच्या बेताल भूमिकेचा परिपाक म्हणून नाली, रस्ते, घरकुल निधीचा पाढा नव्याने आलेल्या मुख्याधिकारी यांच्या समोर वाचण्यात आला. निवेदन, अर्ज, तक्रारी चा ढिगारा यावेळी अभियंता यांच्या हातात प्रदान करण्यात आला. यासर्व प्रलंबित प्रश्नांबाबत निरसन करण्याचा सज्जड दम मनसे कडून देण्यात

अखेर आंदोलनास मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पुढाकार घेऊन नगरपंचायत, महसूल व भूमी अभिलेख प्रशासनास आंदोलन स्थळी पाचारण करीत विस्तृत चर्चेअंती नव्याने आलेले प्रभारी मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी तात्काळ सदर रस्त्याच्या मोजणीकरीता भूमी अभिलेख कार्यालयास पत्र देण्याच्या सूचना करीत त्याचा अंमल करण्यात आला. येत्या सहा नोव्हेंबर रोजी रितसर मोजणी करून रस्ता पूर्णत्वास नेण्याचे अभिवचन देण्यात आले. अशा आशयाचे पत्र आंदोलन कर्त्यांना देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.