Home वणी परिसर क्षत्रिय छिया समाजाच्या अध्यक्ष पदी राजाभाऊ बिलोरिया

क्षत्रिय छिया समाजाच्या अध्यक्ष पदी राजाभाऊ बिलोरिया

165

वणी बातमीदार :- येथील क्षत्रिय छिया बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष पदी राजाभाऊ बिलोरिया यांची अविरोध निवड करण्यात आली.

क्षत्रिय छिया बहुउद्देशीय संस्थेची पुढील पाच वर्षा करिता कार्यकारणी निवड करण्यासाठी विठ्ठल रुखमिनी मंदिरात दि 17 ऑगस्ट ला निवडणूक प्रक्रिया  पार पडली. यामध्ये अध्यक्ष पदी राजाभाऊ बिलोरिया,उपाध्यक्ष सुभाष बिलोरिया, सचिव श्याम बडघरे, सहसचिव  प्रत्योत वैध, कोषाध्यक्ष कैलाश बिलोरीया, तर कार्याध्यक्ष म्हणून अनिल बिलोरिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा रवी मत्ते यांनी काम पाहिले