Home वणी परिसर संस्कृत भाषा वाणी आणि विचार शुद्धीचे साधन- गजानन कासावार

संस्कृत भाषा वाणी आणि विचार शुद्धीचे साधन- गजानन कासावार

158

वणी बातमीदार :-“या देशातील संस्कृत भाषा ही देव भाषा आहे. त्यामुळेच कदाचित भारत भूमीला देव भूमी म्हटल्या जाते. संस्कृत अध्ययनाची वाणी व विचार शुद्ध होतात. व प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी जे ज्ञानाचे भांडार संस्कृत भाषेत लिहून ठेवले आहे, त्या ज्ञानाचे दरवाजे या विषयाच्या अध्ययनाने उघडल्या जातील. त्यामुळे प्रत्येक देशवासीने संस्कृत विषय आवडीने शिकून देववाणीवर प्रभुत्व मिळवावे.” असे विचार  दैनिक तरुण भारत वणीचे प्रतिनिधी, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी व्यक्त केले.

संस्कृत भारती, लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि आदर्श प्रशासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी संस्कृत सप्ताहाच्या प्रथमदिनी ते संस्कृत प्रेमींना शुभकामना देतांना विचार व्यक्त करीत होते.

आजच्या कार्यक्रमात ऋषिकेश मोहरे याने श्लोक , कौमुदी सरमुकद्दम हिने अतुलनीय भारतम् हा निबंध, पल्लवी कुंभारे हिने महाकवी दंडी यांच्या बद्दल माहिती, नव्या चरडे हिने भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय, अनुराधा महालक्ष्मी हिने प्रणम्य शिरसा देवम् हे गणेश स्तोत्र तर नंदा कोंडावार यांनी अन्नपूर्णाष्टकम् सादर केले.

संस्कृत भारती चे सचिव महेश पुंड यांनी विज्ञान प्रदर्शनी चे सादरीकरण केले तर प्रणीता भाकरे यांनी संपूर्ण महिनाभर शिवमहिन्म स्तोत्र पठन तथा निरूपणाचा उपक्रम देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे.