Home वणी परिसर सुरभी चोपणे ओबीसी प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम

सुरभी चोपणे ओबीसी प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम

584

* राष्ट्रीय दुर्बलघटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश

वणी बातमीदार:- तालुक्यातील सावरला येथील सुरभी विनोद चोपणे हिने राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले असून इतर मागासवर्गीय गटातून जिल्ह्यात प्रथम आली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळच्या वतीने विद्यार्थ्यां करिता विविध शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. या मधीलच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आहे. ही परीक्षा इय्यता आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी घेतली जाते.

मागील वर्षी कोरोनाच्या सावटा मुळे ही परीक्षा पुढे धकलण्यात आली होती. दि 6 एप्रिल ला ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून येथील नुसाबाई चोपणे विद्यालयाची विध्यार्थीनि कु सुरभी विनोद चोपणे ही इतर मागासवर्गीय गटातून जिल्ह्यात प्रथम आली आहे.

ग्रामीण भागातील विध्यार्थीनि ने संपादन केलेल्या  या यश बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती येथील विधितज्ञ विनोद चोपणे यांची कन्या आहे.