Home वणी परिसर इंदिराग्राम येथे धान्य किटचे वाटप

इंदिराग्राम येथे धान्य किटचे वाटप

229

* 98 लाभार्थ्यांना मिळाला लाभ

कुंभा (मारेगाव): बंडू डुकरे- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांच्या वतीने इंदिराग्राम येथे आदिवासी खावटी धान्य किट चे वाटप करण्यात आले. यावेळी 100 पैकी 98 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वतीने खावटी धान्य किट चे वाटप करण्यात येते. यामध्ये किराणा सामान यात सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, साखर, तेल पॉकेट इत्यादी 2 हजार रुपयांचे साहित्य देण्यात येते. तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वीच 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. पांढरकवडा येथील शिक्षण विस्तार अधिकारी के.डी. कठाने यांच्या हस्ते किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी शासकीय आश्रम शाळा बोटोनी च्या शिक्षिका एस. एस. भोंगारे, अनिकेत अभिजित ताकसांडे, बिल्लू पोतुजी रामगडे, श्रीकांत गुणवंत खैरे, सुशीला पोतु आत्राम  यांची उपस्थिती होती.