मारेगाव: दीपक डोहणे- मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षपदी आरती संतोष राठोड तर शहर अध्यक्ष म्हणून सिंधू संजय बेसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असतांना वेगवेगळ्या व्यूहरचना आखण्याचा व अनेकांच्या नियुक्त्या करून पक्ष बांधणीवर जोरकसपणे प्रयत्न चालविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यासह शहरात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
पक्षाची मोट बांधण्याचा दृढ दृष्टिकोन ठेवीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्ष पदी भारती संतोष राठोड यांची निवड करण्यात आली. तालुका महिला उपाध्यक्ष म्हणून कुंता अभिमान वाढई यांची तर मारेगाव महिला शहर अध्यक्ष म्हणून सिंधू संजय बेसकर यांचेकडे पदभार सोपविण्यात आला. महिला शहर उपाध्यक्ष म्हणून सविता रमेश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली.