Home वणी परिसर बांधकाम विभागाला मनसेचा ‘इशारा’

बांधकाम विभागाला मनसेचा ‘इशारा’

324

* मुंगोली गावाची मोजणी करा

* मूल्यांकन करून वे.को.ली त दाखल करा

वणी बातमीदार: औद्योगिक विकासाचे दिवा स्वप्न गिरवत वेकोलीने वणी परिसरातील शेतजमिनी अधिग्रहीत केल्या. परिसरात आर्थिक सुबत्ता निर्माण झाली असली तरी प्रकल्प बाधित मुंगोली गावाच्या मागील ‘ग्रहण’ सुटताना दिसत नाही. वेकोलीने अधिग्रहित केलेल्या जमिनीचे मोजमाप करून मूल्यांकनाद्वारे तातडीने किंमत ठरवावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बांधकाम विभागाच्या देत निर्वाणीचा इशारा दिला आहे.

वणी तालुक्यापासून मुंगोली हे गाव 40 किलोमीटर अंतरावर आहे. मुंगोली ग्रामस्थ वेकोली निर्मित समस्यांशी गेल्या अनेक वर्षांपासून झुंज देत आहे. गावाला कोळसा खाणींने पूर्णतः वेढा घातलेला आहे. गावात सभोवताल विकोली निर्मित उंच मातीचे ढिगारे असून ऑस्ट्रेलियन बाबळीचे घनदाट जंगल आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे तर कोळशाच्या दळणवळण आणि प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. प्रामुख्याने ग्रामस्थांना असाध्य आजारांचा सामना करावा लागत आहे. कोळसा खाणीत सतत नियमबाह्य ब्लास्टिंग होत असल्याने अनेकांच्या घराला तडे गेले आहे. यामुळेच तात्काळ पुनर्वसन व्हावे यासाठी माजी सभापती बाबाराव ठाकरे सह ग्रामस्थ आग्रही आहेत.

मुंगोली निर्गुडा डीप  एक्सटेन्शन प्रकल्पासाठी वणी तालुक्यातील मौजा मुंगोली  गावठाण जमीन अधिग्रहित करण्यात आली पुनर्वसन स्थळांची मौज कुर्ली ता वणी जिल्हा यवतमाळ गट क्र . 66/1, 66/2, 66/3, 67 खाजगी जमीन पुर्नवसाहत स्थळ म्हणून वेकोली प्रशासनाने निश्चित करण्यात आली आहे. वरील कामाची मोजणी करुन व किंमत निश्चित करुन संबंधित विभागाला सादर करण्यात यावे असे निवेदन मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर व बाबाराव ठाकरे यांनी बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांना दिले.

बांधकाम विभागाने आठ दिवसात हि प्रक्रिया पुर्वतास न्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कायदा सुव्यस्था बाधित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील असे नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी  धनंजय त्रिंबके, शुभम पिंपळकर, वैभव पुरानकर आदी उपस्थीत होते.