Home राजकीय काँग्रेस प्रदेश कार्यकारणीत कासावार व काळे यांची वर्णी

काँग्रेस प्रदेश कार्यकारणीत कासावार व काळे यांची वर्णी

723

* सरचिटणीस, उपाध्यक्ष पदी निवड 

वणी बातमीदार:तुषार अतकारे – अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेली काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र प्रदेशची जम्बो  कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये माजी आमदार वामनराव कासावार व ऍड देविदास काळे यांची वर्णी लागली आहे.

प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड होताच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्या समोर ठेऊन रणनीती आखली जात आहे. या करिता अनेक नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी सुरू असून दिग्गजांचे पक्ष प्रवेश सुरू आहे.

दि 26 ऑगस्ट ला दिल्ली वरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आले असून वणी येथील माजी आमदार वामनराव कासावार यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

वामनराव कासावार यांनी चार वेळा वणी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे. ते पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाते या पूर्वी त्यांनी जिल्ह्याध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती.

तर  उपाध्यक्ष पदी सहकार क्षेत्रातील दिग्गज असलेले ऍड. देविदास काळे यांना स्थान देण्यात आले आहे. ऍड काळे यांची सहकार क्षेत्रावर चांगली पकड आहे. रंगनाथ स्वामी पतसंस्था व वसंत जिनिगचे ते अध्यक्ष आहेत. खासदार सुरेश धानोरकर यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

काँग्रेस पक्षाने प्रदेश कार्यकारिणीत या दोघांची निवड करून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र  येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला किती यश मिळेल हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. या दोघांच्या  निवडीने मात्र  कार्यकर्त्यां मध्ये आनंदाचे वातावरण आहे.