Home राजकीय अच्छे दिनाचे स्वप्न दाखवीणाऱ्यांनी अच्छे दिन संपविले…..शंकर दानव

अच्छे दिनाचे स्वप्न दाखवीणाऱ्यांनी अच्छे दिन संपविले…..शंकर दानव

266

● माकपचे तालुका अधिवेशन

वणी बातमीदार:- केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकार ने शेतकरी विरोधी कृषी कायदा आणला, कामगारांना चांगले जीवन व सुविधा देणारे कायदे संपवून भांडवलदारांना फायदे पोहोचविणारे कायदे करून कामगारांना देशोधडीला लावले आहे.सार्वजनिक उद्योगक्षेत्राचे खाजगीकरण करून ते भांडवलदारांना विकून देशाला कंगाल करण्याचे काम सुरू असून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणार्यांनी अच्छे दिन संपविले असल्याचे प्रतिपादन शंकर दानव यांनी यांनी मेटीखेडा येथे माकपच्या अधिवेशनात केले.

यावेळी जिल्हा सचिव कुमार मोहरमपुरी व ऍड. दिलीप परचाके उपस्थित होते पुढे बोलतांना दानव म्हणाले की शेतकरी-कामगारांना आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी सतत संघर्ष करण्याची गरज आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात संघर्ष करीत आहे.

दर तीन वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनात तीन वर्षांच्या लेखाजोखा होऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तेरा सदस्यीय तालुका कार्यकारिणीत पालोती गावाचे सरपंच सदाशिव आत्राम यांची कळंब तालुका सचिवपदी निवड करण्यात आली. तर देविदास आत्राम, सुदाम टेकाम, शेवंताबाई टेकाम, शामराव जाधव, मारोती जाधव,सुलाभ पवार, अशोक पवार, मनोहर बुरबुरे, पुरुषोत्तम पाटील, शंकर अंबाडरे , मारोती शेरबंदी, लक्ष्मीबाई मेश्राम यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला

Previous articleयुवकाची गळफास लावून आत्महत्या
Next articleठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.