Home वणी परिसर पीओपी मूर्तीं विक्रीवर निर्बंध, होणार कारवाई

पीओपी मूर्तीं विक्रीवर निर्बंध, होणार कारवाई

209
Img 20240930 Wa0028

* नगर पालिकेचे पथक गठीत

वणी बातमीदार: वणी शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी नगर पालिका सतर्क झाली आहे. मूर्तिकारांना सक्त ताकीद देण्यात आली असून, कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने पथकाचे गठन केले आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. “श्री” च्या मूर्तीची विक्री करण्याकरिता बाहेर गावावरून मूर्तिकार शहरात येत असतात. देखण्या व आखीव, रेखीव मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिस पासूनच तयार केल्या जातात आणि त्या मूर्त्याना चांगली मागणी असते. मूर्तिकार तसेच गणेशमूर्ती विक्री करणारे व्यावसायिक प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या विकतात याला स्थानिक मूर्तिकारांनी आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस व बेकड माती पासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तीवर बंदी घातली आहे. पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे. दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही पीओपी मूर्ती विक्री, साठा व खरेदी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिका प्रशासनाने अशा होणाऱ्या मूर्ती विक्रीवर थांबवण्यासाठी प्रभारी आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांचे पथक गठीत केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस व बेकड माती पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीची विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.