Home Breaking News युवकाची गळफास लावून आत्महत्या

युवकाची गळफास लावून आत्महत्या

1637

* रासा शिवारातील घटना

वणी बातमीदार: तालुक्यातील रासा येथील 30 वर्षीय युवकाने परिसरातील तलावाजवळ असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आत्महत्या की घातपात याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.

निलेश सुधाकर चौधरी(39) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो रासा येथील रहिवासी होता. गावलागतच असलेल्या तलावालगत एका झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो रविवार दि. 29 ऑगस्ट ला आढळून आला. या बाबत ग्रामस्थांना कळताच पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परंतू मृतकाच्या अंगावर खरचटल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शव विच्छेदन अहवालानंतरच खरे चित्र स्पस्ट होईल असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले आहे. तसेच त्या दिशेने सुद्धा तपास करण्यात येईल असे सांगितले.