Home वणी परिसर आशा कोवे यांना ‘साहित्य सेवा सन्मान’

आशा कोवे यांना ‘साहित्य सेवा सन्मान’

154
* पाझर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

वणी बातमीदार:- वणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा येथील सहाय्यक शिक्षिका आशा कोवे यांना मराठी शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात डॉ.अनिल पावशेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यीक दादकांत धनविजय, प्रा. आनंद मांजरखेडे, डॉ सोहन चवरे, मजूर निमजे, रेणुका किन्हेकर व विस्वस्त अरविंद उरकुडे उपस्थित होते.

आशा कोवे यांनी लिहिलेल्या ‘पाझर’ या पहिल्या  काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राहुल पाटील यांनी केले तर चित्रपट निर्मिती कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांनी आभार मानले, यावेळी काव्यरसिक व साहित्यिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.