Home वणी परिसर अभिषा गौरकार हिची शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी..!

अभिषा गौरकार हिची शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी..!

134

* अँरोस्पेस अभियांत्रिकी पदविकेसाठी चेन्नई मध्ये प्रवेश 

* वणी उपविभागात रोवला मानाचा तुरा

        मारेगाव : दीपक डोहणे- “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या वैचारिक उद्बोधनाचा बोध घेत व शिक्षणाची प्रचंड आवड असणाऱ्या कुशाग्र बुद्धीच्या अभिषा हिने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत वणी उपविभागात मानाचा तुरा रोवला आहे. मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील मूळ निवासी व सध्यस्थीतीत वणीत वास्तव्यास असलेल्या या विद्यार्थिनीने पदविका महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे धडे गिरवीत विज्ञान शाखेची अभिषा ही सातत्याने तेरा ते चौदा तास अभ्यासात मग्न राहते. मनाचा दृढ़ निश्चय केलेल्या अभिषाचा तांत्रिक विषयात कमालीची रुची आहे. ही रुची कृतीत उतरवित आजतागायत व्हीआयटीईईई व हिट्स ईईई परीक्षेत प्रावीण्य मिळवित अँरोस्पेस अभियांत्रिकी करिता पात्र झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील केवळ तीनच विद्यार्थी पात्र झाले असतांना यात अभिषा आहे. चेन्नई येथील नामांकित विद्यालयात तिने प्रवेश मिळविला आहे.

भारतातील मिसाइल मॅन भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांनी ही पदवी प्राप्त केली होती. त्यांचे वैज्ञानिक विचार आणि त्यांच्या स्वप्नाला उजाळा देत अभिषाने  स्वप्न साकार केले. तूर्तास शिक्षणाची व पदविका अभ्यासक्रमाची प्रचंड गोडी निर्माण झालेल्या अभिषा हिला आत्तापासूनच मोठ्या पॅकेज सह बड्या कंपनीची आँफर सुरू झाली आहे. मात्र शिक्षणाची व पदवीची जम्बो वाटचाल केल्याशिवाय कंपनीचा विचार करणार नसल्याच्या भावना प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केल्या. अभिषा ही मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांचे पुतणे विजय गौरकार यांची कन्या आहे.

Previous articleनिवासी इमारतीवरील 10 टक्के कर रद् करा
Next articleचिखलगाव च्या उपसरपंच पदी अनिल ताजने
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.