Home राजकीय नगर पालिकेत नगरसेवकाचा शब्द “मातीमोल”

नगर पालिकेत नगरसेवकाचा शब्द “मातीमोल”

147
* स्वखर्चाने कामे करीत असल्याचा दावा 
तुषार अतकारे

नगर पालिका प्रशासन ऐकत नसल्याने स्वखर्चाने प्रभागातील कामे करावे लागत असल्याचा खळबळजनक खुलासा प्रभाग क्र 7 चे नगरसेवक धीरज पाते यांनी केला असून नगर पालिकेत नगरसेवकाचा शब्द “मातीमोल” झाला आहे.

नागरिकांच्या समस्या नगर पालिका प्रशासना पर्यंत पोहचवीण्या करिता नगर पालिकेत  नगरसेवक निवडून पाठवले जातात. प्रभागातील व नागरिकांच्या समस्या पालिका प्रशासना पर्यंत पोहचवून त्याचे निराकरण केले जाते. मात्र प्रभाग क्र 7 मधील कामाची तक्रार करून देखील कामे होत नसल्याचा आरोप नगरसेवक धीरज पाते यांनी केला आहे.

प्रभागाच्या  मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे. त्यामुळे ये जा करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने नगरसेवक धीरज पाते यांनी पालिका प्रशासनाला तीन वेळा या कामाची लेखी तक्रार केली आहे.

नगरसेवकाने केलेल्या  तक्रारी कडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर नगरसेवक पाते यांनी स्वखर्चाने ही कामे करण्याचे ठरवुन त्याची सुरवात केली. हे कामे करीत असतांना त्यांनी ट्रॅक्टर वर फलक लाऊन ” नगर पालिका प्रशासन कामे करीत नसल्याने स्वखर्चाने मी कामे करीत असल्याचे नमूद केले आहे “ त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

पालिकेचे मजुरांचे टेंडर झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात कामे सुरू आहे. पुढे येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षे गायब असलेले पक्षातुन निलंबित करण्यात आलेले नगरसेवक निव्वळ स्टंटबाजी करीत आहे
तारेंद्र बोर्डे  नगराध्यक्ष, वणी

वणी नगर पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. धीरज पाते हे भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र एक वर्षा पूर्वी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. नगरसेवकाने सुरू केलेल्या या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगत असून नगरसेवकाचे पालिका प्रशासन ऐकत नसेल तर नागरिकांचे काय असा प्रश्न ही या निमित्याने उपस्थित होत आहे.