Home वणी परिसर रुजू होताच वाहतूक निरीक्षकांचा कार्यवाहीचा धडाका

रुजू होताच वाहतूक निरीक्षकांचा कार्यवाहीचा धडाका

165

फेरीवाल्यांच्या हात गाड्या जप्त 

तुषार अतकारे

शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या टिळक चौक व मुख्य बाजार पेठेत जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी व व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नुकतेच वणी वाहतूक शाखेत रुजू झालेले वाहतूक निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी कारवाही चा बडगा उगारला आहे.

वणी शहरात वाहन चालकांना शिस्त लागावी व वाहतूक सुरळीत व्हावी या करिता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी वणी येथे सन 2014 मध्ये जिल्हा वाहतूक विभागाची उप शाखा सुरू केली. शहरात या शाखेच्या माध्यमातून एकेरी वाहतूक देखील सुरू करण्यात आली होती मात्र माशी कुठे शिंकली कळायला मार्ग नाही. गेल्या दीड वर्षा पासून ऐकेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठीक ठिकाणी दुकाने थाटल्याने व व्यावसायिकानी दुकानासमोर अतिक्रमण केल्याने वाहन धारकला वाहन चालविण्याकरिता कसरत करावी लागत होती. वाहतूक निरीक्षक आयरे यांची बुलढाणा येथे बदली झाली त्यांच्या रिक्त असलेल्या जागी शिरपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काल निघालेल्या नवीन आदेशात कवाडे यांना वाहतूक निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वाहतूक निरीक्षक मुकुंद कवाडे हे रुजू होताच त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला आहे. मुख्य बाजार पेठात व टिळक चौकातील फेरीवाल्यांवर कारवाहीचा बडगा उगारला आहे. दि 3 सप्टेंबर ला येथील टिळक चौकात वाहतूक पोलिसांचे पथक पोहचताच फेरीवाल्यानी आपल्या हात गाड्या सोडून पळ काढला त्यामुळे  नगर परिषदेच्या सहकार्याने हात ठेले जप्त करून  शहरातील रस्ते मोकळे केले आहे.

मुकुंद कवाडे हे शिरपूर येथे कार्यरत असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी वणी व पांढरकवडा उपविभागा करिता विशेष पथक गठीत केले होते. त्याची जबाबदारी सपोनि मुकुंद कवाडे यांना दिली होती. अल्प कालावधीत कवाडे यांच्या विशेष पथकाने दणदणीत कारवायांचा सपाटा लावून अनेकांना गजाआड केले होते हे विशेष.