Home वणी परिसर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ‘परशुराम पोटे’

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ‘परशुराम पोटे’

114

* मानकी येथे बिनविरोध निवड

वणी – तालुक्यातील मानकी येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी परशुराम पोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मानकी येथील प्रमोद श्रिरसागर हे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने नविन तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी दि 2 सप्टेंबर ला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या सभेमध्ये माजी तंटामुक्त अध्यक्ष परशुराम पोटे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविण्यात आले होते. परंतु त्यांच्या विरोधात दुसरे नाव न आल्याने परशुराम पोटे यांना बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, सदस्य नानाजी पारखी, इंदीरा पोटे, सुनिता कुत्तरमारे, नलीनी मिलमीले, सचिव आगीरकर, पोलीस पाटील मिनाक्षी मिलमीले व गावकरी उपस्थित होते. मानकीच्या इतीहासात पहील्यांदाच तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे हे विशेष.