Home वणी परिसर शेतकरी शेतमजुरांची आरोग्य तपासणी

शेतकरी शेतमजुरांची आरोग्य तपासणी

92

* कुंभा येथे शिबीर व फवारणी किट वाटप

   कुंभा (मारेगाव)- तालुका कृषी अधिकारी कार्यालय मारेगाव यांच्या वतीने कुंभा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुक्रवार दि.3 सप्टेंबर ला आयोजित शिबिरात उपविभागीय कृषी अधिकारी जे.आर.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 50 शेतकरी शेतमजुरांना फवारणी किटचे वाटप करण्यात आले.

आयोजित शिबिरात कुंभा, टाकळी, श्रिरामपुर, इंदिराग्राम, बोरी, साखरा, सिंधी येथील शेतकरी शेतमजूर  यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित शेत मजुरांना सुरक्षित फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एस.के निकाळजे, मंडळ कृषी अधिकारी ए. डी. कनाके, सरपंच अरविंद ठाकरे यांची उपस्थिती होती.

कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी शेतकरी, शेत मजुरांना मार्गदर्शन केले. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे नाकावरील मास्क वापरावे, वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी करू नये, सकाळी फवारणी करावी, फवारणी झाल्यावर स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी, ऑरगॅनिक फास्फेट गटाची कीटकनाशके शक्यतोवर फवारणी करू नये, फवारणी झाल्यावर अंगावरील कपडे बदलावे, बिडी व तंबाखू खाऊ नये असे सांगितले.

यावेळी डॉ. तेजस आस्वले, पोलीस पाटील रामचंद्र मेश्राम, उपसरपंच गजानन ठाकरे,  कृषी सहायक ए. यु. सोनुले, पी. ए. कचाटे, एच. बी. पवार, डी. ए.गाडगे , शामल राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पारस्कर, कृषी सहायक आर. सयाम, जी. कोल्हे, गणेश पेंदोर, कृषी मित्र राजु महाजन, अंकुश जोगी, प्रभाकर किनाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.