Home वणी परिसर NMMS परीक्षेत परीक्षेत हार्दिका काकडे जिल्ह्यातून दुसरी

NMMS परीक्षेत परीक्षेत हार्दिका काकडे जिल्ह्यातून दुसरी

421
Img 20240930 Wa0028

* जनता विद्यालयाचे यश

वणी- महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत जनता विद्यालय वणी येथील 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहे. हार्दिका बबन काकडे हिने घवघवीत यश संपादन करत जिल्ह्यातून दुसरी येण्याचा मान पटकावला आहे.

महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत परीक्षा घेण्यात येते. वणी तालुक्यातून या शिष्यवृत्तीसाठी 15 विद्यार्थी पात्र झालेत त्यापैकी तब्बल 10 विद्यार्थी जनता विद्यालयातील आहेत. या विद्यार्थ्यांना 12 हजार प्रमाणे चार वर्षात 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

शिष्यवृत्ती करिता पात्र झालेले जनता विद्यालयाचे हर्षा विनोद ठमके, राधा अमोल अस्वले, सुमित सुनील झाडे, माही पंढरी पोटे, आरती दिनेश आस्वले, रिधिमा लक्ष्मीकांत निंबटकर, अंजली संतोष तामीलवार, विरश्री रमेश मोहितकर, सोनू प्रवीण कोंगरे हे विध्यार्थी यशस्वी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना सुनील झाडे, पवन निब्रड, राजेन्द्र ढोके यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.

Previous articleजनता विद्यालयात शिक्षक दिन साजरा
Next articleशेतकऱ्यांनो बिनधास्त साजरा करा ‘पोळा’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.