Home वणी परिसर …आणि मनसेने साजरा केला ‘बैलपोळा’

…आणि मनसेने साजरा केला ‘बैलपोळा’

817
Img 20240930 Wa0028

*राजू उंबरकर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वणी- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून राजू उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा अवलंबत शासनाच्या आदेशाविरुद्ध एल्गार पुकारला. सोमवार दि. 6 सप्टेंबर ला वणी विधानसभा मतदारसंघातील मोहूर्ली, पुरड या गावी उंबरकरांनी बैल पोळ्याला उपस्थिती लावत विधिवत पूजा केली आणि कोविड त्रिसूत्रीचे पालन करून आपले सण- उत्सव साजरे करावेत असे उपस्थितांना सांगितले.

श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पोळा सणाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व असते. यानिमित्ताने ठिक ठिकाणी यात्रा मेळाव्याचे देखील आयोजन होते. परंतू प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातले आहे. हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी करु नये असे आव्हान केले असता शासनच्या आव्हानाचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामीण भागात बैलपोळा साजरा करण्यात आला.

शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात आला. जर इतर सर्व सुविधा सुरू केल्या गेल्या तर शेतकऱ्याच्या सर्वात महत्वाचा सनावर बंदी का असा सवाल राजू उंबरकर यांनी उपस्थीत करत येणारे पुढील सर्वच सण परंपरेनुसार साजरे होतील असा सज्जड दम शासनाला दिला. उंबरकरांनी घेतलेल्या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी सभापती धनंजय त्रिंबके , वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते