Home Breaking News पाटाळा पुलावरून विद्यार्थ्यांची ‘उडी’

पाटाळा पुलावरून विद्यार्थ्यांची ‘उडी’

991

*चंद्रपूर जिल्ह्यात आढळला मृतदेह

वणी :-तालुक्यातील राजूर कॉलरीत येथे काकांच्या घरी वास्तव्यास असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने शनिवार दि. 4सप्टेंबरला वर्धा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा गावाजवळील नदीत आढळून आला.

समेध तारक वाघमारे (17) असे मृतकाचे नाव आहे. तो येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो राजूर कॉलरी येथील काकांच्या घरी वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी समेध याने बाहेर जाण्यासाठी काकुला ज्युपिटर या वाहनाची चाबी मागितली आणि तो घराबाहेर पडला. बराचवेळ लोटूनही तो घरी परतला नाही. त्याची शोधाशोध घेण्यात आली असता वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पटाळा येथील पुलावर दुचाकी रविवारी आढळून आली. नदीच्या काठावरून त्याची शोध मोहीम सुरू केली असता दि 6 सप्टेंबर ला सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा या गावाजवळ नदी पत्रात  त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.