बोटोणी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या हस्ते मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जानकाई पोड येथील सहाय्यक शिक्षक पैकुजी आत्राम यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुर्गम भागात वसलेल्या जानकाई पोड गावात केवळ कोलामी बोलली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना कोलामी आणि मराठी अशा दोन्ही भाषा समजावून अध्यापन कोलामी भाषेतील शब्दसंग्रह करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनअसे नियोजन बद्ध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अध्यापणाचे धडे बाबत आजच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रातील, तसेच कोरोना काळातील अद्वितीय योगदानाबद्दल पैकुजी आत्राम यांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कार कार्यक्रमा करिता प्रमुख पाहुणे म्हणून आमदार.डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्रीधर मोहोड,जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम,मनीष मानकर,अरुणा खंडाळकर,शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी,डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता प्रशांत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.