Home क्राईम भालर जंगलात कोंबड बाजारावर धाड

भालर जंगलात कोंबड बाजारावर धाड

693
* पाच लाखाचा मुद्देमाल जप्त 
* शिरपूर पोलिसांची कारवाई

वणी :- शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या भालर मार्गावरील जंगलात कोंबड्याची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या चौघांना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बैल पोळ्या च्या दुसऱ्या दिवशी असलेल्या बडग्याला मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो. त्यावर अंकुश लावण्यासाठी शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले यांनी चार पथके तयार करून गस्त सुरू केली होती. दरम्यान भालर मार्गावर असलेल्या झुडपी जंगलात कोंबड बाजार सुरू होता.

याची गुप्त माहिती ठाणेदार लुले यांना मिळाली सापळा रचून कोंबड्याची झुंज सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली असता कोंबड्यावर पैसे लावून जुगार खेळतांना आढळून आल्याने आशीष अण्णाजी उकीनकर वय २९ वर्ष रा. पुनवट, खुशाल मारोती धोटे वय ४९ वर्ष रा. पुनवट, बंडू सिताराम ढोरे वय ३३ वर्ष रा. पुनवट, धनराज दादाजी सातपुते वय ३३ वर्ष रा. तरोडा या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे जवळून २४ हजार 100 रुपये नगदी जखमी अवस्थेत असलेले कोंबडे, सहा मोटर सायकली, तिन मोबाईल, कोंबडांचे पायात लावण्यात येणारे लोखंडी कात्या असा एकूण  5 लाख 15 हजार 100 रूपये चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाही ही पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले पोउपनि राम कांडुरे, पोहवा दीपक गावंडे, पोलीस नाईक प्रमोद जुनुनकर, सुगद दिवेकर, अनिल सुरपाम, आशीष टेकाडे, विनोद मोतेराव, राजन ईसनकर, अभिजित कोशटवार यांनी केली.