* बक्षिसांची लयलूट
वणी- श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा! पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेकजण “इको फ्रेंडली” गणोशोत्सव साजरा करतात. त्यामुळेच वणी पोलीस स्टेशन व तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने घरगुती गणेशमूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट सजावट, आरास व देखावा साकार करणाऱ्यांना बक्षिसे दिली जाणार आहे.
शासनाने पीओपी च्या गणेशमूर्तीवर निर्बंध लादले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकरिता शाडूच्या मूर्तीच गणेशभक्तांनी घ्याव्यात असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यातच घरगुती गणेशमूर्ती ची सजावट “इको फ्रेंडली” असावी याकरिता प्रयत्न केल्याजात आहे.
वणी पोलीस स्टेशन व तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशभक्तांना “इको फ्रेंडली” उत्सवाची संकल्पना इतरांनाही दाखवता येणार आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस 3100 रुपये, द्वितीय 2100 रुपये तर तृतीय बक्षीस 1100 रुपये असणार आहे. तर घवघवीत प्रोत्साहनपर बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी15 सप्टेंबर पर्यंत फोटो, नाव, पत्ता पाठवावा असे आवाहन अरुण पटेल, भास्कर गोरे, नाना कापसे व शरद बोबडे यांनी केले आहे.