Home वणी परिसर वसंत जिनींगच्या शेतकरी सभासदांचे मेळावे

वसंत जिनींगच्या शेतकरी सभासदांचे मेळावे

159

◆ वणी,मारेगाव व मुकुटबन येथे आयोजन

वणी :- वसंत को. आँप. शेतकरी सहकारी जिनींगच्या वतीने शेतकरी सभासदांचे मेळावे वणी, मारेगाव व मुकुटबन येथे आयोजित करण्यात आले होते.

वसंत जिनिग अँड प्रेसिंग च्या शेतकरी सभासदांना संस्थेच्या कामकाजाची माहिती मिळावी या करिता अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. दि 5 सप्टेबंर ला मुकटबन येथे आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वामनराव कासावार माजी आमदार. संदीप बुर्रेवार सभापती कृ. ऊ. बाजार समिती,  प्रा. टिकाराम कोगंरे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा सहकारी बँक, राजु येल्टीवार, प्रकाश माॅकलवार, उपस्थित होते

तर दि 8 ऑगस्ट ला मारेगाव येथे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वामनराव कासावार हे होते,  प्रमुख अतिथी नानाजी खंडाळकर, नरेंद्र ठाकरे, अरूणा खंडाळकर, शितल पोटे, अनिल देरकर, मारोती गौरकार, शशीकांत आबंटकर, वसंत आसुटकर हे होते

वणी येथील शेतकरी मंदिरा दि 9 सप्टेंबर ला घेण्यात आलेल्या मेळाव्यात अध्यक्ष म्हणुन वामनराव कासावार व प्रमुख अतिथी  प्रतिभा धानोरकर आमदार, डाँ. पावडे, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, पुरूषोत्तम आवारी, संध्या बोबडे हे उपस्थित होते

वसंत जिनिगचे अध्यक्ष ऍड देविदास काळे व उपाध्यक्ष प्रशांत गोहोकार यांनी जिनिगच्या कामाचा लेखाजोखा शेतकरी सभासदांजवळ मांडला कार्यक्रमाचे प्रास्तावीक राजाभाऊ पाथ्रडकर, संचालन विवेक माडंवकर व आभार संजय खाडे यानी मानले. या तिन्ही ठिकाणी झालेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Previous articleवाघाने पाडला गाईचा फडश्या
Next articleबोंडअळीवर रामबाण उपाय ठरतोय ‘ट्रायकोग्रामा’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.