Home राजकीय काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

544

◆ 300 कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश 

वणी :- कॉंग्रेस पक्षवाढीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागला आहे.दि 12 सप्टेंबर ला प्रभाग क्र 5 मध्ये झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात 300 कार्यकर्त्यांनी काँगेस मध्ये प्रवेश केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष आपली मोठ बांधताना दिसत आहे.विखुरलेले कार्यकर्ते एकत्रित आणण्याचा प्रयत्न या निमित्याने होतांना दिसत आहे.राहुल गांधी यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक युवक काँग्रेस मध्ये प्रवेश करतांना दिसत आहे.

दि 12 सप्टेंबर ला बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्रभाग क्र 5 मध्ये पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला माजी आमदार वामनराव कासावार, प्रदेश उपाध्यक्ष ऍड देविदास काळे, तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर,शहराध्यक्ष प्रमोद निकुरे, जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, राजू कासावार, नगरसेवक संतोष पारखी, संदीप बुरेवार, पुरुषोत्तम आवारी, डॉ मोरेश्वर पावडे, ओम ठाकूर, आशिष खुलसंगे, विवेक मांडवकर, अशोक चिंडालिया, रवी देठे उपस्थित होते,

यावेळी सुरेश आसमवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र 5 मधील 300 च्या जवळपास कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्यामुळे कांग्रेस पक्षाला शहरात बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.यावेळी नईम अजीज,प्रमोद लोणारे,गुलाम रंगरेज,शालिनी रासेकर, संध्या बोबडे,ज्योती सूर,वंदना दगडी, वंदना आवारी,मंगला झिलपे,अमिता गंजीवार, जॉन पोनलवार, डेंनी सॅन्ड्रावार,सुरेश बन्सोड, रुपेश ठाकरे, विलास मांडवकर, सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते