Home Breaking News दरोडयाच्या प्रयत्नात असलेली टोळी ‘गजाआड’

दरोडयाच्या प्रयत्नात असलेली टोळी ‘गजाआड’

466

◆शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई 

वणी :- शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंदोला ते कळमना रोडवरील बंद असलेल्या शालीवाहना एनर्जी लिमीटेड या कंपनीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला शिरपूर पोलिसांनी गजाआड केले आहे.

शिंदोला ते कळमना या मार्गावर शालीवाहना एनर्जी लिमीटेड ही कंपनी आहे. या कंपनीतुन वीज निर्मिती केल्या जाते मात्र मागील दोन वर्षापासून सदर कंपनी बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांची नजर या कंपनीवर होती.

सध्या गावोगावी श्रीगणेशा ची स्थापना झाली असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून शिरपूर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दि 11 सप्टेंबरला शालीवाहना एनर्जी लिमीटेड या कंपणीत रात्रीचे सुमारास काही लोक कंपणीतील मौल्यवान साहीत्य ज्यामध्ये तांब्याची तार व इतर वस्तु असे चोरी करण्याच्या इरादयाने येणार असल्याची गुप्त  माहीती शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांना मिळाली होती.

चोरट्यांना रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. साध्या गणवेशात पोलीस पहिलेच शालिवाहना कंपनीत दबा धरून होते रात्री 11 वाजताचे सुमारास पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनातून तीन इसम उतरले व त्यांनी कंपनीत प्रवेश करताच पोलिसांनी मोहसिन निसार शेख (23), शाहरूख शहादतुल्ला कुरेश (24), ताहीद अहमद कुरेशी (22), सर्व रा. घुगुस यांना अटक केली.

त्यांचे जवळून कोयता, कु-हाड, दोरी, दोन लोखंडी आरी पत्ते व मोबाईल असा एकूण 27 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता मौल्यवान साहीत्य चोरी करण्याच्या इरादयाने तेथे आल्याचे व कंपणीचे सुरक्षा रक्षक यांनी त्यांना मनाई केल्यास त्यांना धमकी देवुन सोबत असलेल्या हत्यारांनी जखमी करण्याचा कट असल्याचे उघड झाले. तसेच पळून गेलेल्या इसमांची नावे अजय नायक, जॉनी व कौशल असे असल्याची सांगितले.

आपला डाव फसल्याचे चोरट्यांना कळताच चार चाकी वाहनात असलेले त्यांचे अन्य साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. फरार चोरट्यांचा पोलीस शोध घेत असून ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक, डॉ.खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  सचिन लुले, पोउपनि राम कांडुरे, पोलीस नाईक प्रमोद जुनुनकर, गुणवंत पाटील, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, आशीष टेकाडे, अभिजित कोशटवार यांनी केली