Home क्राईम ‘त्या’ प्रकरणी…हत्त्येच्या दिशेने पोलिसांचा “तपास”

‘त्या’ प्रकरणी…हत्त्येच्या दिशेने पोलिसांचा “तपास”

470

● 30 ते 40 जणांची चौकशी

● आत्महत्या की घातपात संभ्रम कायम

वणी: तालुक्यातील रासा येथे वास्तव्यास असलेल्या 30 वर्षीय युवकाचा परिसरातील तलावाजवळ 29 ऑगस्ट ला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याचे शरीरावर जखमांचे व्रण असल्याने आत्महत्या की घातपात असा संभ्रम निर्माण झाला होता. पोलीस हत्येचा दिशेने तपास करत असून 30 ते 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे.

रासा येथील निलेश सुधाकर चौधरी (30) याचा गावालगत असलेल्या तलावाजवळ गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या बाबत प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सूचित केले होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला असता मृतदेह झाडाखाली पडलेल्या स्थितीत होता तर गळ्याला दोरीचा फास आढळून आला. वजनाने दोरी तुटली असावी असा कयास वर्तवत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

● गळफासच डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज ●

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदन केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी अधिकारी यांनी गळफासाबाबत आकलन केले असता गळफासच असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मृतकाच्या शरीरावर जखमांचे व्रण असल्याने घरच्या मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला. यामुळेच तपास अधिकाऱ्याने त्या दिशेने आपला मोर्चा वळवला. तब्बल 30 ते 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे. संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्यात येत आहे. तांत्रिक बाबीचा अवलंब करण्यात येत आहे परंतू मृतकाचा मोबाईल अद्याप पर्यंत सापडलेला नसल्याने तपासाची दिशा स्पष्ट होत नाही. यामुळेच आत्महत्या की घातपात संभ्रम कायम आहे.