Home वणी परिसर सेवा सप्ताह राबवून साजरा होणार पंतप्रधानां चा वाढदिवस

सेवा सप्ताह राबवून साजरा होणार पंतप्रधानां चा वाढदिवस

224
Img 20240930 Wa0028
आमदार बोदकुरवार यांची पत्रकार परिषदेत माहिती 

वणी :- भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा 17 सप्टेंबर ला वाढदिवस आहे.या वाढदिवसा निमित्याने वणी विधान सभा भारतीय जनता पार्टी च्या वतीने विविध कार्यक्रम राबवून सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या सेवा सप्ताहाची सुरुवात दि. 17 सप्टेंबरला  सकाळी 10 पळसोनी येथील संत बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील निराधारांना भेटून त्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या संयोजिका स्मिता नांदेकर या आहेत. दि. 17 ला दुपारी 4 वाजता बाबापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन. दि. 18 सप्टेंबरला सकाळी 7 भारत अभियानांतर्गत वणी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे संयोजन भाजपा शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखी हे आहेत.

दि. 19 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या निराधार कुटूंबाना त्यांच्या घरी जाऊन मदत देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी बेलुरकर हे अरणार आहेत. दि. 20 ला सकाळी 7 वाजता गौ-मातेची सेवा करण्यासाठी वणी येथील गौरक्षणाला भेट देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा वणी तालुका अध्यक्ष गजानन विधाते हे करणार आहे. व दिनांक 20 रोजी सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे फळ वाटप करणार आहे. याचे संयोजन जिल्हा सचिव किशोर बावणे करणार आहे. दि. 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता येथील 100 सफाई कामगारांना भाजपाच्या वतीने विमा काढून त्या पॉलिसीचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संमोजन भाजयुमो जिल्हा सरचिटणीस नितीन वासेकर हे करणार आहेत.

दि. 22 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप केल्या जाते की नाही. शासनाच्या निकषाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानात गरिबांना सेवा पुरविल्या जाते की नाही या ही शहानिशा दिवसभर होणार आहे. याचे संयोजन जिल्हा सचिव किशोर बावणे हे करणार आहेत. दि. 23 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता कायर येथे आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे संयोजन जिल्हा परिषद सदस्य व गटनेत्या मंगला पावडे व पंचायत समितीच्या माजी सभापती लिशाताई विधाते करणार आहेत

25 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता समाजाला एकतेचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉनआयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे संयोजन भाजयुमोचे संदीप बेसरकर, अवि आवारी, शुभम गोरे व पदाधिकारी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आंबेडकर चौकातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभा मंडपात भव्य रक्तदान शिविर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे संयोजन नगराध्यक्ष नरेंद्र बोर्ड हे करणार आहेत.

या पत्रकारपरिषदेत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, पंचायत समिती सभापती व जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिंदूरकर,  दिनकरराव पावडे, जिल्हा सचिव किशोर बावणे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, वणी विधानसभा संयोजक दिपक पाऊनकर, नगरसेवक राकेश बुग्गेवार प्रामुख्याने उपस्थित होते.