Home वणी परिसर गौरवास्पद…कुणाल सातपुते याची नेत्रदीपक भरारी

गौरवास्पद…कुणाल सातपुते याची नेत्रदीपक भरारी

350
Img 20240930 Wa0028
● बंगलोर येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नियुक्त 
● सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

मारेगाव: दीपक डोहणे

मारेगाव येथील विद्यार्थी तथा मारेगाव तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष धर्मराज सातपुते यांचे चिरंजीव कुणाल सातपुते याने प्रचंड मेहनत व एकाग्रताच्या जोरावर नेत्रदीपक प्रगती केली आहे. बंगलोर येथील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी तो पात्र ठरला असून तालुक्यात त्याचे वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कुणाल याने  सुरुवातीचे प्राथमिक शिक्षणासह मारेगाव येथे दहावी पर्यंत शिक्षण घेतले. त्याला दहावीत 95% गुण मिळाले. त्यानंतर तो इंजिनिअरिंग च्या पुर्वपरिक्षेची तयारी  (JEE mains) करण्यासाठी नागपूर येथे  कोचिंगला प्रवेश घेतला.  त्यात यशस्वी होवून त्याला NITK सुरथकल कर्नाटक येथे मेक्यानिकल इंजिनिअरिंग या ब्रँच साठी प्रवेश मिळाला. त्याचबरोबर बोर्ड च्या बारावीच्या परीक्षेत सुध्दा 95%गुण प्राप्त केले त्यानंतर कोरोनाच्या काळात कँपस मध्ये केवळ दीड वर्ष राहून  त्याने घरी वास्तव्य करीत आॅन लाईन अभ्यास सुरु केला. त्याचबरोबर साफ्टवेअर तसेच कोडिंग स्वतःच शिकला आता इंजिनिअरिंग च्या फायनल मधे असताना त्याची निवड बँगलोर येथे नामांकित कंपनी मध्ये साफ्टवेअर डेवलपमेंट इंजिनिअर या पदासाठी झाली आहे. प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीच्या बळावर आदिवासी बहुल तालुक्यातून हे सर त्याने पार केले.कुणाल याच्या यशाचे सर्वत्र कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुणाल याच्या यशाबद्दल  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगल्भ विचारांची प्रेरणा ,प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांचे अथक सहकार्य लाभले असल्याच्या भावना कुणालने व्यक्त केल्या.