Home वणी परिसर त्या..घटनेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ “भयभीत”

त्या..घटनेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ “भयभीत”

210
डेंग्यूचा वाढता प्रकोप, फॉगिंग द्वारे फवारणी
कुंभा ग्रामपंचायत घेताहेत खबरदारी

    कुंभा (मारेगाव):-

मारेगाव तालुक्यात घडलेली ती घटना अतिशय दुःखद होती. डेंग्यूचा वाढता प्रकोप बघता ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. आरोग्य यंत्रणा सुस्तावलेली असल्याने ग्रामपंचायतीलाच खबरदारी घ्यावी लागणार आहे. कुंभा ग्रामपंचायतीचे सरपंच अरविंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फॉगिंग माशीद्वारे फवारणी करण्यात येत आहे.

मारेगाव शहरातील अवघ्या 30 वर्षीय महिलेचा डेंग्यू सदृश्य आजाराने काही दिवसांपूर्वी दुःखद मृत्यू झाला. डेंग्यू चा प्रकोप सातत्याने वाढताना दिसत आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या बघता आरोग्य विभागाने  सतर्क होऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात सुद्धा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावातील नाल्या साफसफाई करून गावात फॉगिंग करणे आवश्यक आहे.

डेंग्यू च्या आजाराचा शिरकाव गावात होऊ नये याकरिता कुंभा ग्रामपंचायत सरसावली आहे. सरपंच अरविंद ठाकरे यांनी ग्रामपंचायत ची यंत्रणा कामी लावली आहे. गावात ठीक ठिकाणी फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य यंत्रणेने सुद्धा दक्ष राहावे अशी मागणी होत आहे.