Home Breaking News गणेश भक्तांना मास्क चे वाटप

गणेश भक्तांना मास्क चे वाटप

251

नगराध्यक्ष बोर्डे यांचा पुढाकार 

वणी:- गणपती विसर्जन करण्याकरिता निर्गुडा नदीच्या घाटावर पालिका प्रशासनाच्या वतीने विसर्जन कलशा सह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच बरोबर नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी 3000 मास्कचे वाटप गणेश भक्तांना केले आहे.

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाला सुरवात झाली आहे. निर्गुडा नदीवरील घाटावर गणपतीचे विसर्जन केल्या जाते.त्यामुळे पालिका प्रशासनाने गणेश भक्तांना सुविधा मिळाव्या या करिता जय्यत तयारी केली होती.

पालिकेने शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता नदीपात्रालगत तीन ठिकाणी मोठे कलश निर्माण केले. त्याच बरोबर भक्तांना आरती करण्यासाठी टेबल लावण्यात आले होते.

प्रशासनाने गर्दी करू नये असे आवाहन नागरिकांना केले होते.अनेक जण मास्क न लावताच गणेश विसर्जन करण्याकरिता येत असल्याचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी येणाऱ्या नागरिकांना 3000 हजार माक्स चे वाटप केले.