Home वणी परिसर लोढा हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधेने ‘सज्ज’

लोढा हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधेने ‘सज्ज’

486
Img 20240930 Wa0028

आजपासून तीन विभाग कार्यान्वित

वणी- शहरातील प्रख्यात लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवार दि. 20 सप्टेंबर पासून आरोग्य विषयक तीन विभाग कार्यान्वित झाले आहे. लोढा हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधेने ‘सज्ज’ झाल्यामुळे आता रुग्णांना उपचारार्थ नागपूर, चंद्रपूरला जावे लागणार नाही.

शहराचा वाढता आलेख बघता आरोग्यविषयक सोयी सुविधा अपुऱ्या होत्या. काही वर्षांपूर्वी डॉ. महेंद्र लोढा यांनी “लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” ची उभारणी केली होती. त्यात पुन्हा तीन महत्वपूर्ण विभाग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली 20 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले आहेत. यामुळे आता एकाच ठिकाणी विविध प्रकारचे उपचार करता येणार आहेत.

वणी परिसरातील रुग्णांना डायलिसिस करिता नागपूर किंवा चंद्रपूर ला जावे लागत होते. आता लोढा हॉस्पिटल मधेच डॉ. अमित देशपांडे यांच्या मार्गदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या 4 युनिटसह किडनी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्या प्रमाणेच टेस्टट्यूब बेबी सेंटर सुरू करण्यात आले असून डॉ. महेंद्र लोढा, डॉ. रेश्मा हिरापुंगे व डॉ. उज्वला पुरकर यांच्या नेतृत्वात विविध उपचारपद्धती करण्यात येणार आहेत. तसेच नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप मानवटकर लहान मुलांचा दवाखाना सांभाळणार आहेत.

लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नव्याने तीन महत्वपूर्ण विभाग सुरू केल्यामुळे परिसरातील रुग्णावर वेळीच उपचार होणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. लोढा हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधेने ‘सज्ज’ झाल्यामुळे आता रुग्णांना उपचारार्थ नागपूर, चंद्रपूरला जावे लागणार नाही.

Previous articleभारत बंद आंदोलनात सहभागी व्हा
Next articleगणेश भक्तांना मास्क चे वाटप
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.