Home वणी परिसर तहसीलदार पुंडे यांना मातृशोक

तहसीलदार पुंडे यांना मातृशोक

232

कैलास ठेंगणे :- मारेगाव येथील  तहसीलदार दीपक पुंडे यांच्या मातोश्री सुमनबाई पुजाजी पुंडे वय 67 वर्ष यांचे अकस्मात निधन झाले. सुमनबाई पूडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी पारस, तालुका बाळापूर, जिल्‍हा, अकोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागील काही महिन्यापूर्वी त्या हृदयाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यात त्यांची प्रकृतीत सुधारणाही झाली होती. मागील काही दिवसापूर्वी त्या मुलीकडे नागपूर येथे वास्तव्यास होत्या. अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे त्याचे पालन करून मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले, असे तहसीलदार पुंडे यांनी ‘रोखठोक’ सोबत बोलताना सांगितले. तिच्या मागे दोन मुले, एक मुलगी, स्नुषा, नातवंडे असा मोठा परिवार आहे.