Home क्राईम “निलेश” च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या..!

“निलेश” च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या..!

1552
Img 20241016 Wa0023

जलदगती न्यायालयात खटला चालवा

रासा येथील ग्रामस्थांची मागणी

वणीअनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीला, प्रियकराच्या मदतीने यमसदनी पाठविण्यात आले. या प्रकरणात विधी संघर्ष बालकांसह सहा आरोपींचा समावेश आहे. त्यांनी नियोजनबद्ध हत्या केली असून भविष्यात त्यांच्यामुळे धोका निर्माण झाला आहे. या सर्वानाच कठोर शासन व्हावे याकरिता विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी तसेच फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

रासा येथील 30 वर्षीय निलेश सुधाकर चौधरी या होतकरू तरुणांची नियोजनबद्ध हत्या करण्यात आली. हत्येला आत्महत्याचे स्वरूप देण्यात आले. प्रकरण पोलिसात गेल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू ठाणेदार शाम सोनटक्के, तपास अधिकारी आनंद पिंगळे व पथकांनी एक-एक धागा जोडत ती हत्याच असल्याचे तपासातून सिद्ध केले. प्रसंगी “बाजीरावाचा” वापर कला कौशल्याने  करावा लागला तर भावनिक साद घालून आरोपीना बोलते करावे लागले.

तालुक्यातील रासा या लहानश्या गावात घडलेल्या या घटनेने कमालीची खळबळ माजली. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणली यात प्रियकराने अन्य चौघांची मदत घेतली ही बाब मानवी मनाला खटकणारी आहे. अनैतिकतेचे ग्रहण लागल्यावर नाते संबंध संपुष्टात येतात याचा प्रत्यय आला. पत्नी सपना, प्रियकर चंद्रशेखर दुर्वे यांनी आशिष पिदूरकर, योगेश उघडे, गौरव दोरखंडे व एका विधी संघर्ष बालकाला आपल्या कटात सामील करून घेतले आणि घटनेला आयाम दिला.

निलेश चौधरी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पुन्हा अश्या प्रकारचे हत्याकांड रासा परिसरात व महाराष्ट्रात घडणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच सदर केस प्रकरण जलद गतीने न्यायालयात स्पेशल केस ( Fast track Court) चालविण्यात यावी व स्पेशल सरकारी वकील ऍड. उज्वल निकम किंवा चांगल्या नामांकित सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.