● हान रट्टा क्लबची 45 हजाराची मदत
वणी:- घरात अठरा विश्व दारिद्र, मोलमजुरी करून परिवाराचे पोट भरणाऱ्या बापाची कर्करोगग्रस्त 4 वर्षाच्या मुलाला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न, मात्र खर्च मोठा असल्याने हतबल झालेला बाप. मदतीची आर्तहाक समाज बांधवांनी केली, आणि मदतीचे हात पुढे सरसावले. ही बातमी शहरातील ‘हान रट्टा’ क्लब का कळली, आणि चक्क 45 हजार रुपयांची मदत केली.
युग कैलास मालेकर असे 4 वर्षीय कर्करोग ग्रस्त बालकाचे नाव असून तो शिंदोला येथील रहिवासी आहे. वडील कैलास मोलमजुरी करून परिवाराचे पालन पोषण करीत आहे. कसाबसा परिवाराचा गाडा चालवीत होता. सहा महिन्या पूर्वी एकुलता एक मुलगा ‘युग’ ला किडनीच्या कॅन्सर चे निदान झाले आणि बापाच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र हिंमत न हारता कैलास ने नागपुर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उपचार सुरू केले.
‘युग’ ची एक किडनी ऑपरेशन करून काढण्यात आली आहे. त्याचे वर सहा महिन्यांपासून उपचार सुरू आहे. महागडे औषध व इतर खर्च मोठा असल्याने कैलास आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी युग च्या मदती करिता पुढाकार घेतला. गावातून 75 हजार रूपये लोकवर्गणी जमा केली तसेच त्यांनी युग करिता मदतीचे आवाहन केले होते. ‘युग’ च्या उपचारार्थ आवाहनाला प्रतिसाद देत येथील ‘हान रट्टा’ क्लब च्या सदस्यांनी युग च्या वडीलाला 45 हजार रुपयांची मदत केली आहे.
‘युग’ च्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी कैलास वारलू मालेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा शिंदोला. खातेक्रमांक 005411002100647 आयएफएससी कोड (UTIBOSYDC 54) या क्रमांकावर मदत पाठवण्याची विनंती आहे. आपली मदत चिमुकल्याच्या उज्वल भविष्याकरिता मोलाची ठरणार आहे.