Home Breaking News कोळश्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात

कोळश्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात

798
Img 20240930 Wa0028

शिरपूर पोलिसांची कारवाई 

चालका वर गुन्हा दाखल 

वणी –

वाहनात अनधिकृत कोळसा वाहून नेत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर ठाणेदार सचिन लूले यांना मिळाली. चोरीचा कोळसा असल्याचा संशय आल्याने वाहन ताब्यात घेऊन चालका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहे. या खाणीतून देशभरात कोळसा वितरित केल्या जातो मात्र वेकोली अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘कोलमाफिया’ मोठ्या प्रमाणात कोळश्याची चोरी किंबहुना तस्करी करतात हे पोलिसांनी केलेल्या कारवाया वरून सिद्ध होत आहे.

दि 23 सप्टेंबर ला MH-28-T-1676 या आयशीयर वाहनातून कोरपना मार्गावरून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांना मिळाली होती. सदर वाहन थांबवून वाहनांची तपासणी केली असता वाहनात कोळसा आढळून आला.

चालक विशाल वैद्य याला कोळश्या बाबत विचारणा केली असता कोळसा कोरपना येथे नेण्यात येत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना संशय निर्माण झाल्याने वेकोली प्रशासनाशी संपर्क साधून माहिती मागविण्यात आली असून वाहन पोलीस ठाण्यात लावण्यात आले. चालक विशाल वैद्य व अन्य एका अनोळखी इसमा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी 5 लाख 50 हजार रुपये किमतीचे कोळसा भरलेले वाहन जप्त केले आहे.

Previous articleआणि…उपसंचालक अधिकाऱ्यांवर “संतापले”
Next articleगळफास लावून युवकाची आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.