Home Breaking News गळफास लावून युवकाची आत्महत्या

गळफास लावून युवकाची आत्महत्या

721

रंगारीपुरा येथील घटना 

वणी:- शहरातील रंगारीपुरा येथे वास्तव्यास असलेल्या 27 वर्षीय युवकाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

आशिष किशोर तोडकर असे युवकाचे नाव असून तो रंगरिपुरा येथे आपल्या परिवारा सह राहतो. तो कॅटरिंग चे काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दि 24 सप्टेंबर ला त्याचे वडील पहाटे 4 वाजता कामावर जाण्यासाठी निघाले होते त्यांनी आशिष च्या खोलीत बधितले असता नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने हे टोकाचे पाऊल का घेतले याची माहिती मिळू शकली नाही त्याचे मागे आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

Previous articleकोळश्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात
Next articleबार मालकाला पोलिसांची “मारहाण”
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.