Home वणी परिसर भाजपाच्या सेवा सप्ताहात ‘रक्तदान’ शिबिर

भाजपाच्या सेवा सप्ताहात ‘रक्तदान’ शिबिर

254

 471 रक्तदात्यांनी केले रक्त दान

वणी :- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटल्या जाते.भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवून सेवा सप्ताह राबविण्यात आला.या सप्ताहात घेण्यात आलेल्या शिबिरात 471 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्फुर्त प्रतिसाद दिला.

भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य, चिंतनशील विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्य भाजपच्या वतीने सेवा सप्ताह घेण्यात आला होता.या सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम भाजपच्या वतीने राबविण्यात आले होते.

समारोपीय दिवशी दि 25 सप्टेंबरला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे संयोजक असलेल्या या रक्तदान शिबिरात 471 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवी बेलूरकर, राजु पडगिलवार, रघुवीर अहीर, सभापती संजय पिंपलशेंडे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते उपस्थित होते. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस असल्याने रक्तदान शिबिरात उपस्थित असलेल्या कार्यकत्यांनी व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.