Home वणी परिसर चक्क…आंदोलनकर्त्यांनी काढली महावितरणची ‘अंत्ययात्रा’

चक्क…आंदोलनकर्त्यांनी काढली महावितरणची ‘अंत्ययात्रा’

634

मुकूटबन महावितरण कार्यालयावर धडक

झरी: तालुक्यात सातत्याने सुरू असलेला विजेचा लपंडाव, बोगस वीज मीटर, रिडींग मध्ये येत असलेली तफावत, अवाच्या-सव्वा मिळणारी वीज देयके यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चक्क.. महावितरण ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. सोमवार दि.27 सप्टेंबरला मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधले.

झरी-जामनी तालुक्यातील मुकूटबन येथे सोमवारी महावितरण कार्यालयावर पाचभाई यांच्या नेतृत्वात विविध समस्या घेऊन नागरिक धडकले. यावेळी अभिनव तिरडी आंदोलन काढल्याने जनतेचे लक्ष वेधण्यात आले.

तिरडी अंत्ययात्रा आंदोलनात विविध मागण्या रेटून धरण्यात आल्या. यात प्रामुख्याने झरी जामनी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करावा, मुख्यालयी अधिकारी असावा, मुकुटबंन येथे वीज दुरुस्ती केंद्र देण्यात यावे, बोगस रिडींग घेणाऱ्यावर कारवाई करावी अश्या मागण्या करण्यात आल्या.

मुकुटबंन बसस्थानक पासून तर महावितरण कार्यालयापर्यंत तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण उपकार्यकरी अभियंता यांनी समस्त जनतेला ग्वाही व लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, लक्ष्मी बच्चेवार, गोविंदा उरकुडे, अडेगाव च्या सरपंच सीमा लालसरे, ग्रा.प.सदस्या वंदना पेटकर, संतोष पारखी , संजय आत्राम, खातेराचे सरपंच विशाल ठाकरे, येडशीचे सरपंच विनोद धोटे, कोसारा चे सरपंच सचिन गोडे, जीवन उलमले, बाळू चेडे, शंकर भगत, विलास कसोटे, मंगेश चामाटे, गणेश पेटकर, राहुल ठाकूर, विजय लालसरे व तालुक्यातील समस्त विद्युत पुरवठामुळे त्रस्त झालेले नागरिक उपस्थित होते.