Home वणी परिसर पहाटेचा तो एक तास, विजेच्या कडकडटाने परिसर “दणाणला”

पहाटेचा तो एक तास, विजेच्या कडकडटाने परिसर “दणाणला”

508
Img 20240930 Wa0028

धुव्वाधार पाऊस, कर्णकर्कश आवाज, आकाशात रोषणाई

वणी: पावसाची फटकेबाजी अद्याप संपलेली नाही. आयपीएल सामन्याला लाजवेल अशी सुरू आहे. दिवसा-रात्री वेळ मिळेल तेव्हा बरसतो आहे. सोमवार दि. 27 सप्टेंबरला पहाटेचा तो एक तास, विजेच्या कडकडट, धुव्वाधार पाऊस, कर्णकर्कश आवाज, आकाशात रोषणाईने परिसर दणाणून सोडला.

सोमवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान दमदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यातच विजेचा कर्णकर्कश आवाजातील कडकडाट, वातावरणाचे रौद्ररूप दर्शवत होते. प्रति मिनिटाला परिसर दणाणून सोडत असतानाच घरांना हादरे बसण्यापर्यंत मजल गेली होती.

मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनोत्तर काळातच असंतुलित वातावरणाने विजा चमकतात. हवेतील वाढलेले बाष्प, वरच्या बाजूस जाणारा हवेचा प्रचंड झोत आणि उष्णतेने होणारे अभिसरण यामुळे ढगांतून विजांची निर्मिती होते. अनेकदा वातावरणातील थंड हवा रात्रीच्या वेळी खाली येऊ लागल्याने रात्री उशिरा किंवा पहाटे विजांची वादळे निर्माण होतात आणि त्याचा प्रत्यय पहाटे आला.