Home Breaking News विवाहितीने घेतला गळफास

विवाहितीने घेतला गळफास

1087

मारेगाव येथील घटना

मारेगाव : दीपक डोहणे- शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील एका विवाहीत महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना दुपारी तीन वाजताचे दरम्यान उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ज्योती रवींद्र पडलवार (33) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. ती प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोन कोवळ्या मुलांना घेऊन कीर्तीवार यांचे घरी भाड्याने राहत होती. घटनेच्या वेळी दोन्ही मुले स्लॅब वर पतंग उडवीत होते. अशातच दोन्ही मुले खाली उतरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असताना आतून बंद होता.

आई नेमकी कुठे गेली म्हणून मारेगावात असलेल्या मोठ्या आईला बोलाविले. खिडकीतून पाहिले असता ज्योतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच हंबरडा फोडला. मृतक ज्योतीच्या पश्चात मुलगा नैतिक (10) व मुलगी आदिती (7) वर्षाची आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनास्थळी बघणाऱ्यांची रीघ लागली आहे.